देशभरातील हज हाऊस बनणार कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:07 IST2021-04-27T04:07:06+5:302021-04-27T04:07:06+5:30

हज कमिटी ऑफ इंडियाचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशभरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव आणि अपुऱ्या बेडमुळे ...

Kovid Care Center to become Haj House across the country | देशभरातील हज हाऊस बनणार कोविड केअर सेंटर

देशभरातील हज हाऊस बनणार कोविड केअर सेंटर

हज कमिटी ऑफ इंडियाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशभरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव आणि अपुऱ्या बेडमुळे रुग्णांचे हाल होत असताना हज कमिटी ऑफ इंडियाने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. देशभरातील विविध राज्यातील हज हाऊस आता कोरोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कोरोना कोअर सेंटर उभारण्यात येईल.

हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसूद खान यांनी ‘लोकमत’ला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, या भीषण संकटाचा सामना समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे केला पाहिजे. रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बेडमुळे मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे सध्या बंद असलेल्या हज हाऊसचा वापर रुग्ण सेवेसाठी केला जाईल, अल्पसंख्याक विकासमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

देशातील विविध राज्यातील १४ हज हाऊसचा त्यासाठी वापर केला जाणार आहे.

Web Title: Kovid Care Center to become Haj House across the country