कोकण रेल्वेत मंगळसूत्र चोरी

By Admin | Updated: January 13, 2017 06:07 IST2017-01-13T06:07:28+5:302017-01-13T06:07:28+5:30

माणगाव रेल्वे स्टेशनमध्ये रात्री ३ वाजण्याच्या सुमारास कोकणकन्या गाडी थांबली असता

Konkan Railway Tigers | कोकण रेल्वेत मंगळसूत्र चोरी

कोकण रेल्वेत मंगळसूत्र चोरी

माणगाव : माणगाव रेल्वे स्टेशनमध्ये रात्री ३ वाजण्याच्या सुमारास कोकणकन्या गाडी थांबली असता चोरट्याने खिडकी शेजारी बसलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खिडकीतून हात घालून लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणाची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
२ आॅक्टोबर, २०१५ ला रात्री ३ वाजता कोकणकन्या ही एक्स्प्रेस माणगाव या स्टेशनवर थांबली होती. खिडकीतून रेश्मा शिंदे यांचे सुमारे तीस हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केला. या घटनेची तक्रार संगमेश्वर पोलीस हद्दीत दिली असता. हा गुन्हा जिल्हा नियंत्रण कक्षातून माणगाव हद्दीत घडल्याने माणगाव पोलीस ठाण्यात३ जानेवारीला रजिस्टर करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Konkan Railway Tigers