कोळी समाजाने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

By मनोहर कुंभेजकर | Published: September 24, 2023 07:33 PM2023-09-24T19:33:32+5:302023-09-24T19:34:30+5:30

अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघाचे अध्यक्ष मोहित रामले यांनी ही माहिती दिली.

koli community took darshan of the lalbaugcha raja | कोळी समाजाने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

कोळी समाजाने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, मुंबई: आज दुपारी दीड वाजता कोळी समाजाने आपली एकजूट दाखवत लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन घेतले.अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ तसेच मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्था, कुलाबा कोळी समाज, वेसावा कोळी समाज, वरळी कोळी समाज, माहुल कोळी समाज, मढ - भाटी कोळी समाज, मांडवी कोळी समाज, माहीम कोळी समाज व इतर सर्वच कोळी बांधव आपण एकत्र आलो आणि आपला हक्क मिळवून घेतला.

अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघाचे अध्यक्ष मोहित रामले यांनी ही माहिती दिली.आज एकजुटीने लालबागचा राजा गाठला उद्या मुंबई व कोकण किनारपट्टी मानाने मिळवूया असे त्यांनी ठामपणे सांगितले. अशीच एकजूट आपण दाखवली तर फक्त लालबागचा राजाच नाही तर सर्वच आपली देवस्थाने, मासळी बाजार, मासळी व्यवसाय, एसटी आरक्षण व नोकरीं व कोळीवाडे तसेच राजकीय क्षेत्रात आरक्षण सर्वच आपले हक्क आपण आणि लालबागचा राजा कमिटी मध्ये देखील मानाचे स्थान मिळवू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: koli community took darshan of the lalbaugcha raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.