कोल्हापूर पीसीआरच्या अधीक्षकपदी पी. आर. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:13 AM2019-09-20T06:13:35+5:302019-09-20T06:13:39+5:30

कोल्हापूरच्या अधीक्षकपदी पी. आर. पाटील तर वैशाली कुडकर यांची सोलापूर शहर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Kolhapur PCR to be Superintendent R. Patil | कोल्हापूर पीसीआरच्या अधीक्षकपदी पी. आर. पाटील

कोल्हापूर पीसीआरच्या अधीक्षकपदी पी. आर. पाटील

Next

मुंबई : नागरी हक्क संरक्षणाच्या (पीसीआर) कोल्हापूरच्या अधीक्षकपदी पी. आर. पाटील तर वैशाली कुडकर यांची सोलापूर शहर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाच्या वतीने गुरुवारी जारी करण्यात आले.
अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचार प्रतिबंधासाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांची मागणी कोल्हापूर परिक्षेत्रातून करण्यात येत होती. पी. आर. पाटील हे नागपूर एसीबीमध्ये कार्यरत असताना त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याबाबतची तक्रार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्यामुळे ‘मॅट’ने सरकारला फटकारत त्यांची तातडीने नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाटील यांची कोल्हापूर पीसीआरच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोल्हापूर पीसीआरच्या वैशाली कुडुकर यांची सोलापूर शहर उपायुक्तला बदली केली आहे. तर ठाणे शहरच्या स्मार्तना पाटील यांची पुणे वायरलेसला, गुप्त वार्ता विभागातील राहुल श्रीरामे यांची पीसीआरच्या अप्पर नियंत्रकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच उपअधीक्षक यशवंत केडगे यांची वाशीम मंगळूरपीर उपविभागात व सोमनाथ तांबे यांची चांदुर, अमरावती ग्रामीण उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

Web Title: Kolhapur PCR to be Superintendent R. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.