Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचा विक्रम, शांघायमधून शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:19 IST

मुंबईतील रुग्णावर रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात भारताने आज एक मोठी ऐतिहासिक झेप घेतली आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने ५००० कि.मी. अंतरावरून जगातील पहिली आंतरराष्ट्रीय ‘रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया’ यशस्वीपणे पार पाडली आहे. विशेष म्हणजे, रुग्ण मुंबईत होते आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे सर्जन डॉ. टी. बी. युवराजा हे चीनमधील शांघायमध्ये बसून रोबोट नियंत्रित करत होते.

या प्रक्रियेत दोन रुग्णांवर ‘रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी’ आणि ‘पार्शियल नेफ्रेक्टॉमी’ या गुंतागुंतीच्या युरोलॉजिकल शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी ‘तौमाई’ या प्रगत रिमोट रोबोटिक सर्जरी सिस्टीमचा वापर करण्यात आला.

हॉस्पिटलचे सीईओ डॉ. संतोष शेट्टी यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “या ऐतिहासिक कामगिरीमुळे आता भौगोलिक अंतर उपचारांच्या आड येणार नाही. दुर्गम भागातील रुग्णांनाही जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांकडून घरबसल्या उपचार मिळणे आता शक्य होणार आहे.” भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच ‘क्रॉस-बॉर्डर’ शस्त्रक्रिया आहे. (वा.प्र.) 

English
हिंदी सारांश
Web Title : Kokilaben Ambani Hospital performs world's first international remote robotic surgery.

Web Summary : Mumbai's Kokilaben Hospital achieved a medical feat, conducting the first international remote robotic surgery. A surgeon in Shanghai controlled a robot to operate on patients in Mumbai, marking a new era for remote medical interventions and accessibility for patients in remote locations.
टॅग्स :हॉस्पिटल