चाकूने वार, २ लाखांची लूट
By Admin | Updated: September 4, 2015 00:46 IST2015-09-04T00:46:39+5:302015-09-04T00:46:39+5:30
कार्यालयातील २ लाखांची रक्कम एका व्यापाऱ्याला देण्यासाठी जात असलेल्या तरुणावर चाकूने वार करत लुटल्याची घटना बुधवारी दुपारी कुर्ला परिसरात घडली.

चाकूने वार, २ लाखांची लूट
मुंबई : कार्यालयातील २ लाखांची रक्कम एका व्यापाऱ्याला देण्यासाठी जात असलेल्या तरुणावर चाकूने वार करत लुटल्याची घटना बुधवारी दुपारी कुर्ला परिसरात घडली. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मकसूद शेख असे या तरुणाचे नाव असून, तो वडाळा परिसरात राहणारा आहे. बुधवारी दुपारी कार्यालयातील २ लाखांची रक्कम घेऊन तो कुर्ला येथे आला होता. कसाईवाडा पुलावरून जात असताना दोन इसमांनी त्याला मारहाण करत पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने विरोध करताच आरोपींनी चाकूने वार करत पैशांची पिशवी हिसकावून घेतली. (प्रतिनिधी)