Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर पेडणेकर यांचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:14 IST

मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना अखेर माफी मागावी लागली.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर समर्थ रामदास स्वामींच्या 'मनाचे श्लोक'चा दिसतो. प्रभाव त्यामुळेच बाबासाहेबांनी चांगले वर्तन करणारा नागरिक घडावा यावर भर असलेले संविधान दिले, असे विधान काही माध्यमांशी बोलताना केल्यामुळे अडचणीत आलेल्या मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना अखेर माफी मागावी लागली.

मुंबईतील शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करावे, अशी ठरावाची सूचना त्यांनी पालिकेच्या आगामी महासभेच्या कार्यक्रम पत्रिकेत मांडली आहे. आगामी महासभेत या प्रस्तावावर चर्चा अपेक्षित असून पेडणेकर यांनी माफी मागितली असली तरी हा मुद्दा महासभेत चर्चिला जाईल, अशी चिन्हे आहेत.

काय म्हणाल्या पेडणेकर ? 

'मनाचे श्लोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे संविधान यांचा संबंध मी जोडला असे वाटून कोणाची मने दुखावली असतील, तर मी माफी मागते. पुन्हा अशी जोडणी मी कधीच करणार नाही', अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी माफी मागितली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pednekar Apologizes After Controversial Remark on Ambedkar and Ramdas Swami

Web Summary : Kishori Pednekar apologized for linking Ambedkar to Ramdas Swami's teachings. Her statement sparked controversy regarding 'Manache Shlok' in schools. Despite the apology, the issue is expected to be discussed in the upcoming municipal corporation meeting.
टॅग्स :किशोरी पेडणेकरमुंबई