किशोर मेहता यांचा अंतरिम जामीन कायम
By Admin | Updated: November 30, 2014 01:52 IST2014-11-30T01:52:58+5:302014-11-30T01:52:58+5:30
किशोर मेहता यांना बुधवारी अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांनी मंजूर केलेल्या 2 लाख रुपयांच्या अंतरिम जामिनावर शनिवारी मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी शिक्कामोर्तब केले.

किशोर मेहता यांचा अंतरिम जामीन कायम
मुंबई : लीलावती रुग्णालयाच्या संस्थापकांचे पुत्र किशोर मेहता यांना बुधवारी अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांनी मंजूर केलेल्या 2 लाख रुपयांच्या अंतरिम जामिनावर शनिवारी मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी शिक्कामोर्तब केले.
अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांनी मेहता यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याची नियमित सुनावणी शनिवारी मुख्य महानगर दंडाधिकारी रा.स. पावसकर यांच्यासमोर झाली. त्यात न्यायालयाने मेहता यांचा जामीन कायम केला व यावरील सुनावणी चार आठवडय़ांसाठी तहकूब केली. मेहता यांनी 1995 - 2क्क्2 या काळात 2क् लाख अमेरिकन डॉलरचे हिरे दुबई व हाँगकाँगला निर्यात केले होते. या व्यवहाराचा तपशील उघड न झाल्याने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मेहता यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. त्याच्या चौकशीसाठी समन्स जारी करूनही हजर न झाल्याने ईडीने विशेष न्यायालयाला मेहता यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली.
त्यानुसार न्यायालयाने मेहता यांच्याविरोधात वॉरंट जारी केले. त्यानंतर ईडीने मेहता यांना अटक केली व अतिरिक्त महानगर दंडाधिका:यांसमोर हजर केले. न्यायालयाने मेहता यांना 2 लाखांचा अंतरिम जामीन मंजूर केला. याची पुढील सुनावणी शनिवारी मुख्य दंडाधिकारी पावसकर यांच्यासमोर झाली. त्यात मेहता यांचे वकील आबाद पोंडा यांनी अंतरिम जामीन कायम करण्याची विनंती न्यायालयाला केली. याला ईडीने विरोध केला. हे प्रकरण गंभीर असून, वारंवार समन्स जारी करूनही मेहता हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत; तेव्हा त्यांचा जामीन रद्द करावा, असा युक्तिवाद ईडीने केला.
मात्र मेहता यांना ईडीचे समन्स मिळालेच नाही. हे समन्स दुस:याच्या नावे जात होते. त्यामुळे मेहता यांचा चौकशीसाठी हजर राहण्याचा प्रश्नच नसल्याचे अॅड. पोंडा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. अखेर न्यायालयाने मेहता यांचा जामीन कायम केला. दरम्यान, वांद्रे येथील लीलावती रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणावरून मेहता कुटुंबात वाद सुरू आहे. धर्मादाय आयुक्तांकडे याची स्वतंत्र सुनावणी सुरू आहे. (प्रतिनिधी)