Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kisan Long March : देशाचा पोशिंदा विधानभवनावर धडकला अन् अखेर सरकारला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 04:58 IST

तो देशाचा पोशिंदा... पण त्याच्या पोटापाण्याचे काय? त्याचा विचार कोण करणार? त्यासाठी अनेकदा याचना केल्या... प्रसंगी आत्महत्या करत जीवन संपविले... त्या वेळी कुटुंबाने टाहो फोडला.

मुंबई-  तो देशाचा पोशिंदा... पण त्याच्या पोटापाण्याचे काय? त्याचा विचार कोण करणार? त्यासाठी अनेकदा याचना केल्या... प्रसंगी आत्महत्या करत जीवन संपविले... त्या वेळी कुटुंबाने टाहो फोडला, पण त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोलाच नाही. शेवटी दु:ख, कष्ट, संघर्ष अन् सहनशीलतेचाही अंत झाला. हजारोंच्या संख्येने पायी वाटचाल करत, देशाचा हा पोशिंदा विधानभवनावर धडकला अन् अखेर सरकारला त्यांची दखल घ्यावीच लागली. 80टक्के मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत, असे आंदोलकांना समजल्यानंतर त्यांनी मैदान सोडले. त्यानंतर, या आंदोलकांच्या परतीचा प्रवास तरी सुखाचा व्हावा, यासाठी यासाठी एसटी, रेल्वे प्रशासनाने विशेष सोय केली.रविवारी रात्री १ वाजतादहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेळेआधीच सोमय्या मैदानाहून किसान मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघाला.रात्री ३ वाजतावैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन मोर्चात सामील झाले.रात्री ३.१९ वाजतामोर्चा परळ टीटी उड्डाणपुलावर पोहोचला.रात्री ३.४० वाजता मोर्चा लालबाग उड्डाणपुलावर पोहोचला.पहाटे ५.१५ वाजतामोर्चेकरी आझाद मैदानावर धडकले.सकाळी ७ वाजता प्रातर्विधी व उपचारासाठी शेतकºयांच्या शौचालय व रुग्णवाहिकेसमोर रांगा.सकाळी १०.३० वाजताछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात विखुरलेले शेतकरी व्यासपीठासमोर एकवटले.दुपारी १२ वाजताकिसान सभेच्या नेत्यांच्या भाषणाला सुरुवात.दुपारी १२.१५ वा.किसान सभेच्या १२ नेत्यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी आझाद मैदानातून रवाना.दुपारी १२.५६ वा.विधानभवनात शिष्टमंडळ पोहोचले.दुपारी १.१० वाजतामुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाच्या मॅरेथॉन बैठकीला सुरुवात.सायंकाळी ४ वाबैठक संपली.सायंकाळी ४.३० वाजताकिसान सभेचे केंद्रीय नेते खासदार सीताराम येंचुरी आझाद मैदानात दाखल.सायंकाळी ५.२० वाजतामुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून शिष्टमंडळ आझाद मैदानातील व्यासपीठावर पोहोचले.सायंकाळी ६.१२ वाजतालढा यशस्वी ठरल्याने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा.सायंकाळी ७.१० वाजताआझाद मैदानातून मोर्चेकरी परतीच्या प्रवासाला निघाले.

टॅग्स :किसान सभा लाँग मार्च