कीर्ती शिलेदारना किलरेस्कर पुरस्कार
By Admin | Updated: November 30, 2014 01:51 IST2014-11-30T01:51:11+5:302014-11-30T01:51:11+5:30
अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना 2क्14-15चा संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किलरेस्कर म्हणजेच संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कीर्ती शिलेदारना किलरेस्कर पुरस्कार
मुंबई : चित्रपट, दूरदर्शन आणि अन्य मनोरंजनाच्या आक्रमणानंतरही मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणा:या स्वरसम्राज्ञी तथा अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना 2क्14-15चा संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किलरेस्कर म्हणजेच संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाटय़ कलाकारास संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या आहेत. पुणो विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवीधर असलेल्या कीर्ती शिलेदार यांनी विविध संगीत नाटकांतून अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या नाटकांचे चार हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. विदेशात त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजविल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणून दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये जनरल कौन्सिलच्या सदस्या म्हणूनही मानाचे पद भूषविले आहे. (प्रतिनिधी)
शिलेदार यांची गाजलेली नाटके
‘अभोगी’, ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्र’, ‘द्रौपदी’, ‘भेटता प्रिया’, ‘मंदोदरी’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘ययाति आणि देवयानी’, ‘रंगात रंगला श्रीरंग’, ‘रामराज्यवियोग’, ‘रूपमती’, ‘विद्याहरण’, ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘श्रीरंग प्रेमभंग’, ‘संशयकल्लोळ’,
‘सौभद्र’, ‘स्वयंवर’, ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकांमध्ये शिलेदार
यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत.