कोकणच्या राजाची व्हॉट्सअॅपवर धूम!
By Admin | Updated: May 13, 2015 00:39 IST2015-05-13T00:39:27+5:302015-05-13T00:39:27+5:30
‘कोकणचा राजा..आला रे’ म्हणत व्हॉट्सअपवर आंब्याचा मौसम सुरु झाल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर काहींनी आंबा खाताना फोटो

कोकणच्या राजाची व्हॉट्सअॅपवर धूम!
मुंबई : ‘कोकणचा राजा..आला रे’ म्हणत व्हॉट्सअपवर आंब्याचा मौसम सुरु झाल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर काहींनी आंबा खाताना फोटो, अगदी आंब्यासोबत ‘सेल्फी’ काढत डीपी आणि स्टेट्स अपडेट केले.त्यामुळे कोकणच्या राजाची अशी व्हॉट्सअपवर धूम सुरु असताना याचाच फायदा एका अवलियाने आंब्याच्या विक्रीसाठी करायचा ठरवला आहे.
शेतकरी दलालांच्या मध्यस्थीशिवाय कोकणातील आंबा विकू शकत नाही, या विधानाला काही खोडत या सुभाष जाधव यांनी व्हॉट्सअपवरुन आंब्यांची विक्री सुरु केली आहे. सुभाष जाधव हे मूळचे शेतकरी असून आपल्या मुलाच्या मदतीने ही शक्कल लढविली आहे.विशेष म्हणजे जाधव हे ग्राहकांना पूर्णपणे नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे उपलब्ध करुन देत आहेत. ते आंबे पिकवण्यासाठी कोणत्याही रसायनांचा वापर करत नाहीत. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्राहकांना फक्त एका क्लिकवर रत्नागिरीचा अस्सल हापूस आंब्याची चव चाखता येते, असे जाधव यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेच्या माध्यमातून आंबा देशाला मोठा प्रमाणात परकीय चलन मिळवून देतो.यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी आपण हा उपक्रम सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अनेक शेतकरी या माध्यमातून आमच्यासह आंबा विकत असल्याचे सुभाष जाधव सांगतात. (प्रतिनिधी)