Join us

पश्चिम बंगालमधील मारेकऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 00:30 IST

पश्चिम बंगालमधील मारेकऱ्याला मुंबईत अटक करण्यास वडाळा पोलिसांना यश आले आहे. दालीम अल्लाउदीन शेख (३५) असे अटक आरोपीचे नाव आहे.

मुंबई : पश्चिम बंगालमधील मारेकऱ्याला मुंबईत अटक करण्यास वडाळा पोलिसांना यश आले आहे. दालीम अल्लाउदीन शेख (३५) असे अटक आरोपीचे नाव आहे.वडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा मूळचा पश्चिम बंगालच्या बेहरामपूरचा रहिवासी आहे. १२ जानेवारी रोजी तेथे एकाची हत्या करून त्याने मुंबई गाठली. मुंबईत तो एका बांधकाम साइटवर ओळख लपवून मजूर म्हणून काम करू लागला. बेहरामपूर पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर दीड महिन्यानंतर तो मुंबईतील वडाळा येथील बंगालीपुरा भागात राहत असल्याची माहिती बेहरामपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी बुधवारी वडाळा पोलिसांना याबाबत सांगितले.वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्रनाथ विश्वास यांच्या पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला मजुरांमध्ये त्याचा शोध सुरू केला. अ‍ॅण्टॉप हिल येथील एका बांधकाम साइटवर तो काम करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शेखला अटक केली. त्यानुसार, बेहरामपूर पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आला आहे.त्याला आता न्यायालयात हजर केले जाईल़ तेथे त्याची पोलीस कोठडी घेण्यासाठी अर्ज केलाजाईल़ न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर त्याची अधिक चौकशी होईल़