परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी केली मित्राच्या आईची हत्या

By Admin | Updated: October 28, 2014 09:14 IST2014-10-28T09:12:36+5:302014-10-28T09:14:20+5:30

परीक्षेत मार्क वाढवून घेण्यासाठीतसेच मौजमजेसाठी पैशांचीगरज भासल्याने तिघा मित्रांनीआपल्याच मित्राच्या आईचीहत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Killed the friend's mother to increase the mark in the examination | परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी केली मित्राच्या आईची हत्या

परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी केली मित्राच्या आईची हत्या

अंबरनाथ : परीक्षेत मार्क वाढवून घेण्यासाठीतसेच मौजमजेसाठी पैशांचीगरज भासल्याने तिघा मित्रांनीआपल्याच मित्राच्या आईचीहत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केलीअसून, त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. 
आरोपी वीरेंद्र नायडू (२२), अश्‍विनी सिंग (२२) आणि विशाल भोसले (१७) हे एकत्र शिकत होते. आदित्य उमरोटकर याच्यासोबत त्यांचीमैत्रीहोती. आदित्यची आई स्नेहल उमरोटकर (५२) या १८ ऑक्टोबरला घरात एकट्याच असताना त्यांची हत्या करण्यात आली. त्यांनी चॅट करताना आदित्यची आई घरात एकटीअसल्याची माहिती काढली आणि त्याचे घर गाठले. क्लोरोफॉर्मने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्नेहल यांनी प्रतिकार केल्याने या तिघांनी कटरच्या साहाय्याने त्यांची हत्या केली. त्यांनी २0 हजार रुपये आणि मंगळसूत्र चोरले. मार्क वाढवून घेण्यासाठीआरोपींना पैशांची गरज असल्याने आणि मजा करण्यासाठी या पैशांचा वापर ते करणार होते.

Web Title: Killed the friend's mother to increase the mark in the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.