क्लीनअपच्या धडकेत वृद्धा ठार
By Admin | Updated: February 1, 2015 01:49 IST2015-02-01T01:49:21+5:302015-02-01T01:49:21+5:30
महापालिकेच्या क्लीनअप डंपरने दिलेल्या धडकेत रस्त्यावरून पायी जाणारी वृद्धा जागीच ठार झाली. शनिवारी सकाळी मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडीत घडली.

क्लीनअपच्या धडकेत वृद्धा ठार
मुंबई : महापालिकेच्या क्लीनअप डंपरने दिलेल्या धडकेत रस्त्यावरून पायी जाणारी वृद्धा जागीच ठार झाली. शनिवारी सकाळी मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडीत घडली. वामन ढाकू मटकर (५२) या क्लीनअप चालकाला मालाड पोलिसांनी अटक केली.
हा क्लीनअप मालाड पी उत्तर विभाग कार्यालयांतर्गत कचरा उचलतो. अकराच्या सुमारास विभाग कार्यालयातून बाहेर पडताना चालक मटकर याच्या निष्काळजीपणामुळे क्लीनअप डंपरची धडक रस्त्यावरून चालणाऱ्या गंगाबेन बिरजीभाई जेठवा(६५) यांना बसली. धडकेने गंगाबेन खाली कोसळल्या. जवळपास असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेल्या गंगाबेन यांना तत्काळ जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मालाड पोलिसांनी मटकर याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून गंगाबेन यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवून अटक केली.(प्रतिनिधी)