मावस बहिणीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:00 IST2020-12-02T04:00:09+5:302020-12-02T04:00:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी कुरार पोलिसांनी चौकशी करत ...

Kidnapping of mother and sister | मावस बहिणीचे अपहरण

मावस बहिणीचे अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी कुरार पोलिसांनी चौकशी करत नाशिकमधून अपहृत मुलगी तसेच अपहरणकर्त्याला रविवारी ताब्यात घेतले.

मालाडच्या कुरार भागात अपहृत मुलीचे कुटुंब राहते. या ठिकाणी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला एक अल्पवयीन मुलगा व त्याची मावस बहीण तिच्या राहत्या घरातून घेऊन पळून गेली होती. भावाबहिणीने त्या मुलीला नाशिकमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी कुरार पोलिसांनी चौकशी करत अखेर त्या दोघांचा माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत अपहृत मुलीची सुटका करण्यात आली. दोन्ही भावंडांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Web Title: Kidnapping of mother and sister