मुंब्य्रात अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोन मायलेकाला अटक
By Admin | Updated: July 17, 2016 05:07 IST2016-07-17T05:07:39+5:302016-07-17T05:07:39+5:30
एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला मुंब्य्रात डांबून ठेवणाऱ्या वेगवेगळ्या दोन मायलेकांना ठाणे शहर गुन्हे शाखेच्या ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने पकडून त्या मुलीची अवघ्या ३६ तासांत

मुंब्य्रात अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोन मायलेकाला अटक
ठाणे : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला मुंब्य्रात डांबून ठेवणाऱ्या वेगवेगळ्या दोन मायलेकांना ठाणे शहर गुन्हे शाखेच्या ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने पकडून त्या मुलीची अवघ्या ३६ तासांत सुटका केली आहे. हा प्रकार टेलिफोन बुथवरून आलेल्या कॉल तसेच त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून उघडकीस आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तरन्नूम मोहमद हुसेन मेमन (३५), तिचा मुलगा शहबाज (१९) तसेच परवीन इस्माईल खान (३५) तिचा मुलगा इब्राहिम (१९) अशी अटक केलेल्या मायलेकांची नावे आहेत. हे चौघे मुंब्य्राच्या आझादनगर येथे एकाच रूममध्ये राहतात. त्यांनी परिसरातील १४ वर्षीय मुलीला फूस लावून ११ जुलै रोजी मालाडला पळवून नेले होते. (प्रतिनिधी)