तरुणीचे अपहरण आणि बलात्कार ?

By Admin | Updated: July 7, 2017 06:55 IST2017-07-07T06:55:00+5:302017-07-07T06:55:00+5:30

तीन युवकांनी अपहरण करुन धावत्या कारमध्ये अश्लील चाळे केल्याचा आरोप एका पंचवीस वर्षीय तरुणीने केला आहे. याप्रकरणी

Kidnapping and rape? | तरुणीचे अपहरण आणि बलात्कार ?

तरुणीचे अपहरण आणि बलात्कार ?

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तीन युवकांनी अपहरण करुन धावत्या कारमध्ये अश्लील चाळे केल्याचा आरोप एका पंचवीस वर्षीय तरुणीने केला आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी तिघांविरोधात अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
सकाळी सातच्या सुमारास पीडित मुलगी कॉलेजला निघाली होती. तेव्हा एक कार तिच्याजवळ आली आणि कारमध्ये बसलेल्या तिघांनी तिला गाडीत खेचले. त्यानंतर ही गाडी मालाड-मढच्या दिशेने नेण्यात आली. या दरम्यान या तिघांनी आळीपाळीने मुलीसोबत अश्लील चाळे करत तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर तिला चालत्या कारमधून बाहेर फेकून दिले. त्यानंतर या मुलीने रिक्षा पकडली आणि चारकोप पोलीस ठाणे गाठले. जबरदस्ती करणारे युवक मराठी बोलत होते, त्यापैकी एकजण ‘माझ्यापासून दूर राहा असे तुला आम्ही बजावले होते ना’ असे सतत बडबडत होता अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. तरुणीच्या तक्रारीवरुन चारकोप पोलीस आणि गुन्हे शाखा युनीट अकरा तपास करीत आहे. घटनास्थळी असलेले सीसीटटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत. युवतीच्या तक्रारीवरुन अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप याप्रकरणी अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Kidnapping and rape?