‘किक’चे ट्रेलर असेल खास

By Admin | Updated: June 9, 2014 23:59 IST2014-06-09T23:59:18+5:302014-06-09T23:59:18+5:30

सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे सल्लूमियाँला आता त्याच्या ‘किक’ या चित्रपटाकडून ब:याच अपेक्षा आहेत.

'Kick' trailer will be special | ‘किक’चे ट्रेलर असेल खास

‘किक’चे ट्रेलर असेल खास

>सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे सल्लूमियाँला आता त्याच्या ‘किक’ या चित्रपटाकडून ब:याच अपेक्षा आहेत. दिग्दर्शक साजीद नादियाडवालाही हा चित्रपट खास बनवण्यासाठी भरपूर प्रयत्न करताना दिसतो. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून त्याने चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनसाठी नऊ परदेशी तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रने दिलेल्या माहितीनुसार साजीदने चित्रपटाच्या ट्रेलरसाठी या टीमची नेमणूक केली आहे. चित्रपटाला फायनल टच देणो आणि प्रोमो तयार करण्याची जबाबदारीही या टीमची असेल. नऊ परदेशी तज्ज्ञ काम करणार असल्याने सलमानच्या किकचे ट्रेलर नक्कीच खास असेल. 

Web Title: 'Kick' trailer will be special