खालापूर भूमीअभिलेख कार्यालयात शुकशुकाट
By Admin | Updated: February 6, 2015 22:53 IST2015-02-06T22:53:24+5:302015-02-06T22:53:24+5:30
महाराष्ट्र राज्य भूमीअभिलेख कर्मचारी संघटनेने पुकारलेले बेमुदत आंदोलन सुरूच असल्याने कार्यालये ओस पडली आहेत.

खालापूर भूमीअभिलेख कार्यालयात शुकशुकाट
खालापूर : महाराष्ट्र राज्य भूमीअभिलेख कर्मचारी संघटनेने पुकारलेले बेमुदत आंदोलन सुरूच असल्याने कार्यालये ओस पडली आहेत. रायगडमधील शेतकरीवर्गाचे आंदोलनात नुकसान होत असून जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. त्यामुळे खालापूर भूमीअभिलेख कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे.
राज्यातील भूमीअभिलेखमधील कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी २७ जानेवारीपासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. तांत्रिक दर्जासह सुधारित वेतनश्रेणी, वाढत्या नागरिकरणामुळे नव्याने नगर भूमापन कार्यालये निर्माण करावीत, राज्यातील अनेक रिक्त पदे तत्काळ भरावीत, पालघर जिल्हा भूमीअभिलेख अधीक्षक पदासह इतर कर्मचाऱ्यांची पदे भरावीत, मोजणी प्रकरणे १५ वरून १२ करावीत, राज्याच्या पुनर्मोजणीसाठी नव्याने आस्थापना तयार करून पदोन्नती देताना विभागातच देण्यात यावीत, अशी मागणी रायगड जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र जाधव यांनी केली आहे. यावेळी खालापूर येथे उपाध्यक्ष एस. एस. कांबळे, अनंत दामले, तानाजी जाधव आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकऱ्यांची कामे रखडली
४कामबंद आंदोलनाचा फटका
४जमिनीच्या मोजणीची सर्व कामे ठप्प
४नकाशे, उतारे मिळत नसल्याने शेतकरी हैराण
४शासकीय कामे पूर्णपणे खोळंबली
४शहरे आणि खेड्यांमधील जमिनीबाबतची कामे रेंगाळली