खडसेंचे नोकरशाहीवर तोंडसुख!

By Admin | Updated: March 4, 2015 01:52 IST2015-03-04T01:52:49+5:302015-03-04T01:52:49+5:30

आदेश काढण्यात न आल्याने कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरशाहीवर तोंडसुख घेतल्याचे समजते.

Khadseen bureaucratic mindset! | खडसेंचे नोकरशाहीवर तोंडसुख!

खडसेंचे नोकरशाहीवर तोंडसुख!

नाशिक : औद्योगिक मंदी, बेरोजगारी, ब्लॅक मनी या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या अर्थसंकल्पात लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना काहीसा दिलासा दिला असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.
जुना गंगापूर नाका येथील शंकराचार्य न्यास सभागृहात लघुउद्योग भारतीच्या वतीने ‘अर्थसंकल्प २०१५’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. गोविलकर म्हणाले की, देशात पाच लाख ७७ हजार लघुउद्योग आहेत. यातील ६२ टक्के उद्योग अनुसूचित जाती जमातीमध्ये मोडणाऱ्या वर्गाचे आहेत. या वर्गाचा विकास झाल्यास उद्योगाला गती मिळेल. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात ‘मुद्रा’ बॅँक ही संकल्पना पुढे आणली आहे. या मुद्रा बॅँकेच्या माध्यमातून उद्योगांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याकरिता प्रतिवर्षी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मध्यम आणि लघुउद्योगांसाठी बिल डिस्काउंट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘अटल इनोव्हेशन मिशन’मधून संशोधन व तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले जाणार असून, या माध्यमातून रोजगार निर्मितीचे ध्येय समोर ठेवले आहे. याकरिता दीडशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्याचबरोबर उद्योगांमध्ये विदेशी गुंतवणूक करण्यासाठी लागणाऱ्या नियमांना शिथिलता दिली असल्याने त्याचा लाभ उद्योगांना होणार आहे. कर व परवानग्यांमध्ये उद्योजकांना दिलासा दिल्याने येत्या काळात उद्योगांना चांगले दिवस येतील, असेही डॉ. गोविलकर यांनी सांगितले. यावेळी विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काले, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी, उपाध्यक्ष संजय कपाडिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार ओतलीकर यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Khadseen bureaucratic mindset!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.