Join us

पक्ष बदलल्याने ‘ईडी’ची कारवाई, खडसे यांची न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 07:57 IST

आपण राजकीय पक्ष बदलल्यानंतर ‘ईडी’ने भोसरी भूखंड प्रकरणाची चौकशी मागे लावली, अशी माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

मुंबई : आपण राजकीय पक्ष बदलल्यानंतर ‘ईडी’ने भोसरी भूखंड प्रकरणाची चौकशी मागे लावली, अशी माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.भोसरी भूखंड प्रकरणी २०१६ मध्ये तक्रार नोंदविली आणि २०१८ मध्ये पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. पक्ष बदलल्यावर ईडीने अचानक हस्तक्षेप सुरू केला. त्यामुळे त्यांच्या समन्सपासून संरक्षण मिळावे, असा युक्तिवाद खडसे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे केला. खडसे यांच्याविरोधात आर्थिक गुन्ह्यासंदर्भात के सकेली आहे. त्यात जामिनावर सुटकेची तरतूद नाही. तसेच खडसे यांना अनेक आजार असल्याने त्यांना नियमित रुग्णालयात दाखल व्हावे लागते, असा युक्तिवाद पोंडा यांनी केला. ...त्यानंतर बजावले समन्स!खडसेंना ईडीने डिसेंबर २०२० मध्ये समन्स बजावले. त्यांनी राजकीय पक्ष बदलल्यावर जून २०२० मध्ये ईडीने गुन्हा नोंदविला. तक्रार २०१६ मधली आहे, समन्स नंतर बजावले, असा युक्तिवाद पोंडा यांनी केला.

टॅग्स :एकनाथ खडसे