मुलासाठी राजीनामानाट्यदीपक केसरकर : सावंतवाडीतील सभेत नारायण राणेंवर टीकास्त्र

By Admin | Updated: August 5, 2014 23:22 IST2014-08-05T22:46:37+5:302014-08-05T23:22:15+5:30

मला पाच वर्षात आमसभा घेण्यास दिली नाही

Kesarkar resigns for son: Narayan Ranever in Sawantwadi rally | मुलासाठी राजीनामानाट्यदीपक केसरकर : सावंतवाडीतील सभेत नारायण राणेंवर टीकास्त्र

मुलासाठी राजीनामानाट्यदीपक केसरकर : सावंतवाडीतील सभेत नारायण राणेंवर टीकास्त्र


सावंतवाडी : मी कोकणचा स्वाभिमान म्हणून पक्ष सोडला तर राणेंनी मुलासाठी राजीनाम्याचे नाटक केले, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. ते सावंतवाडीतील सभेत बोलत होते.
केसरकर म्हणाले, मी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. तो विकासाचा भगवा आहे. जिल्ह्याचा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून विकासात कोणाशीही तडजोड करणार नाही. सावंतवाडी मतदारसंघात मी आणलेल्या निधीमधून झालेल्या कामांचे उद्घाटन करून श्रेय लाटण्याचे काम केले. मला पाच वर्षात आमसभा घेण्यास दिली नाही. तसेच वेंगुर्ले येथील सभेत माझ्यावर चप्पल फेकण्याची कृती केली. माजी आमदार शिवराम दळवी यांच्या हॉटेलची नासधूस करून त्यांच्या पत्नी व मुलाला मारहाण करण्यात आली. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरेश दळवी यांच्या मागे गुंड लावण्यात आले. हा दहशतवाद नव्हे का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. मी आता पूर्णपणे शिवसेनेचा सेवक म्हणून काम करेन. माझ्या बरोबर आलेले कार्यकर्ते केसरकर समर्थक नसून तेही शिवसैनिकच असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले, आता सिंधुदुर्गमध्ये फक्त शिवसेनेचाच दरारा राहील. राणेंचे गुंडपुंड शिल्लक राहणार नाहीत. आता दहशतवाद कोण करणार नाही आणि कोणी केला, तर त्याचे उत्तरही त्याच पध्दतीने द्यावे, असे आव्हान यावेळी त्यांनी केले. या सभेत माजी आमदार शंकर कांबळी, सुरेश दळवी, अनारोजीन लोबो, मंगेश तळवणेकर, राजन पोकळे, प्रकाश परब, भाई विचारे, शर्वरी धारगळकर, अशोक दळवी, सुकन्या नरसुले, जान्हवी सावंत, प्रवीण सावंत, संजय भोगटे, समाधान बांदवलकर, विलास जाधव, काशिनाथ दुभाषी, देवेंद्र टेमकर, राघोजी सावंत, रिटा आल्मेडा आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काहींनी तांत्रिक कारणांमुळे शिवसेना प्रवेश करण्याचे टाळले. (प्रतिनिधी)
शिवसेनेला मदत केली म्हणून माझी विकेट
मी राष्ट्रवादीचे मनापासून काम केले. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये माझे खच्चीकरण करण्यात आले. शिवसेनेला मनापासून मदत केली, म्हणून मला सिध्दिविनायक ट्रस्टमधून काढण्यात आले. हा अन्याय मी कसा सहन करायचा? शिवसेनेच्या माध्यमातून मला घर मिळाले आहे. त्यांचे मी मनापासून काम करेन, असे यावेळी सुभाष मयेकर म्हणाले.
दुधात साखर पडली : दळवी
शिवसेना प्रवेशामुळे आता दुधात साखर पडली आहे. त्यामुळे येथील वातावरण भगवामय झाले आहे. आमच्या सेना प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद नक्कीच वाढेल, असा विश्वास सुरेश दळवी यांनी व्यक्त के ला.

Web Title: Kesarkar resigns for son: Narayan Ranever in Sawantwadi rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.