Join us

देशातील सर्वोत्तम 15 रुग्णालयांमध्ये केईएम सहाव्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 13:11 IST

दर्जेदार उपचार आणि विविध आजारांवर संशोधन करणा-या भारतातील सर्वोत्तम 15 रुग्णालयांची यादी प्रसिद्ध झाली आहे.

ठळक मुद्देप्रतिकुल परिस्थिती असूनही केईएम रुग्णालय आपला लौकिक टिकवून आहे. मुंबई शहर आणि उपनगरातूनच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागातून रुग्ण इथे उपचार घेण्यासाठी येतात.

मुंबई -  दर्जेदार उपचार आणि विविध आजारांवर संशोधन करणा-या भारतातील सर्वोत्तम 15 रुग्णालयांची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत मुंबईतील केईएम रुग्णालयानेही स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये महापालिकेचे केईएम रुग्णालय सहाव्या स्थानावर आहे. केईएम पश्चिम भारतातील दुस-या क्रमांकाचे सर्वोत्तम सरकारी रुग्णालय आहे. 

विविध आजार आणि औषधांवर संशोधन करणा-या रुग्णालयांमध्ये केईएमचा पहिल्या दहा रुग्णालयांमध्ये समावेश होतो. वीक मॅगझिनने सर्वे करुन भारतातील पहिल्या पंधरा सर्वोत्तम रुग्णालयांची यादी प्रसिद्ध केली. केईएम पालिकेचे मुंबईतील सर्वात मोठे रुग्णालय आहे. वास्तविक केईएम रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. 

रुग्ण संख्येच्या  तुलनेत डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय स्टाफही कमी पडतो. मात्र इतकी प्रतिकुल परिस्थिती असूनही केईएम रुग्णालय आपला लौकिक टिकवून आहे. भारतातील सर्वोत्तम रुग्णालयामध्ये केईएमचा समावेश होणे हे त्याचेच उदहारण आहे. 

केईएममध्ये वेगवेगळया आजारांचे विविध विभाग आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातूनच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागातून रुग्ण इथे उपचार घेण्यासाठी येतात. अत्यंत स्वस्त आणि किफायतशीर दरात उपचार हे केईएम रुग्णालयाचे आणखी एक वैशिष्टय आहे. 

टॅग्स :हॉस्पिटल