अॅडमिशनसाठी केली बोगस सही
By Admin | Updated: July 17, 2016 05:15 IST2016-07-17T05:15:19+5:302016-07-17T05:15:19+5:30
महाविद्यालयीन प्रवेशाची लगबग सुरू आहे. यातच एका तरुणीने प्रवेशासाठी के.सी महाविद्यालयाच्या उपप्राचार्याची बोगस सही करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याची घटना मरिन ड्राइव्हमध्ये उघडकीस

अॅडमिशनसाठी केली बोगस सही
मुंबई : महाविद्यालयीन प्रवेशाची लगबग सुरू आहे. यातच एका तरुणीने प्रवेशासाठी के.सी महाविद्यालयाच्या उपप्राचार्याची बोगस सही करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याची घटना मरिन ड्राइव्हमध्ये उघडकीस आली. समीना उस्मानी (२६) असे प्रतापी तरुणीचे नाव असून, तिला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली आहे.
के. सी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार वलानी यांची स्वाक्षरी समिनाने पाहिली होती. याचाच फायदा घेत, तिने अकरावीच्या प्रवेशासाठी एका अर्जावर वलानी यांची बोगस सही करून तो अर्ज क्लार्कच्या हातात दिला.’ वलानी यांनी प्रवेश अर्ज तुमच्याकडे देऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले, अशी माहिती तिने क्लार्कला दिली. उपप्राचार्यांनी सांगितले, म्हणून क्लार्कनेही अर्ज स्वीकारला. अर्जावरील स्वाक्षरी पाहून संशय आल्याने क्लार्कने वलानींकडे धाव घेतली, तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच मरिन ड्राइव्ह पोलिसांनी कॉलेजमध्ये धाव घेत तरुणीला ताब्यात घेतले. बोगस सही करून फसवणूक केल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी तिल्
ाा अटक केली आहे. न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असल्याची माहिती मरिन
ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट यादव यांनी दिली. (प्रतिनिधी)