'आपला दवाखाना' रात्री दहापर्यंत सुरू ठेवा; आमदार योगेश सागर यांचे पालिका आयुक्तांना पत्र

By मनोहर कुंभेजकर | Published: August 23, 2023 09:19 AM2023-08-23T09:19:45+5:302023-08-23T09:20:45+5:30

जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ‘आपला दवाखाना’ क्लिनिकचे उद्घाटन केले होते. 

keep aapla dawakhana till 10 pm mla yogesh sagar letter to municipal commissioner | 'आपला दवाखाना' रात्री दहापर्यंत सुरू ठेवा; आमदार योगेश सागर यांचे पालिका आयुक्तांना पत्र

'आपला दवाखाना' रात्री दहापर्यंत सुरू ठेवा; आमदार योगेश सागर यांचे पालिका आयुक्तांना पत्र

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, मुंबई - अल्पावधीतच जनसेवेच्या कार्यामुळे लोकप्रिय झालेली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना महापालिका राबवत आहे. या योजनेचे गांभीर्य, कल्पकता आणि उपयोगिता लक्षात घेता जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ‘आपला दवाखाना’ क्लिनिकचे उद्घाटन केले होते. 

'आपला दवाखाना' हा उपक्रम लोकांना आरोग्य तपासणी, औषधे, तपासणी आणि निदान यांसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मोफत पुरवतो. या दवाखान्यांची लोकप्रियता लक्षात घेता मुंबईत आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत आणि रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत ही दवाखाने सुरू ठेवावीत अशी विनंती चारकोप विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार योगेश सागर यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहाल यांच्याकडे केली साहे. 

योगेश सागर यांनी पत्रात म्हटलं की, मुंबईतील बहुतेक रहिवासी कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करतात आणि संध्याकाळी ७ नंतरच घरी पोहोचू शकतात. मुंबईचा कणा आणि शहराच्या प्रगतीचे इंजिन असलेल्या कामगार वर्गासाठी संध्याकाळी ५ वाजेपूर्वी डॉक्टरांना भेटणे शक्य नाही. महापालिका ही यशस्वी मोफत आरोग्य सेवा चालवत असल्याने, जिथे उपचार आणि निदान आणि अगदी औषधोपचार दोन्ही मोफत आहेत, ते दवाखाने रात्री १० वाजेपर्यंत उघडले तरच मोठ्या कामगार वर्गाला त्याचा लाभ घेता येईल असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

आठवड्यातील सहाही दिवस कामगार वर्ग कामावर असतो. वेळ मिळतो तो फक्त रविवारीच! सर्व कामगार वर्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा लाभ मिळावा यासाठी दवाखाने किमान रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत उघडे ठेवावेत जेणेकरून लोकांना वैद्यकीय सल्ला, चाचण्या आणि मोफत उपचार मिळू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याला आणखी यशस्वी आणि लोककल्याण व सेवा साधायाची असेल तर  दवाखाने रात्री १०  वाजेपर्यंत आणि रविवारी दुपारी १२  वाजेपर्यंत सुरू ठेवावे लागतील. प्रवासाचे अंतर, आणि मुंबईतील कामाच्या लोकसंख्येचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन, तुम्ही हे लवकरात लवकर कराल आणि या घोषणेला व्यापक प्रसिद्धी द्याल अशी मागणी आमदार योगेश सागर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

Web Title: keep aapla dawakhana till 10 pm mla yogesh sagar letter to municipal commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.