केडीएमसी आयुक्तांची बदली

By Admin | Updated: January 21, 2015 01:55 IST2015-01-21T01:55:59+5:302015-01-21T01:55:59+5:30

सुशील खोडवेकर यांना तडकाफडकी त्या पदावरून दूर करून त्यांच्या जागी बृहन्मुंबईचे अतिरिक्त आयुक्त (यूएलसी) एम. जी. आर्दड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

KDMC Commissioner Replaces | केडीएमसी आयुक्तांची बदली

केडीएमसी आयुक्तांची बदली

मुंबई : जेमतेम आठवडाभरापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या सुशील खोडवेकर यांना तडकाफडकी त्या पदावरून दूर करून त्यांच्या जागी बृहन्मुंबईचे अतिरिक्त आयुक्त (यूएलसी) एम. जी. आर्दड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वस्तूत: अर्दाड यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. मात्र अर्दाड यांनी आपली बदली रद्द करून कडोंमपाचे आयुक्तपद प्राप्त केले आहे.
याखेरीज शिक्षण आयुक्त पुणे या पदावर बदली करण्यात आलेल्या आबासाहेब जऱ्हाड यांनीही आपली बदली रद्द करून औद्योगिक विकास मंडळात सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर वर्णी लावून घेतली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला नंदकुमार यांच्या रुपाने स्वतंत्र प्रधान सचिव लाभला आहे.
राज्य सरकारमधील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरुच आहे. मंगळवारी आणखी ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. को-आॅप मार्केटींग फेडरेशन (मुंबई)चे व्यवस्थापकीय संचालक या पदावरून नंदकुमार यांची शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
सीमा व्यास यांची राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदावर असलेल्या एम. बी. गायकवाड यांची मत्स्योत्पादन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कांबळे यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या एफडीआयच्या आयुक्तपदावर असलेले पी. एन. भापकर यांची को-आॅप मार्केटींग फेडरेशन (मुंबई)चे व्यवस्थापकीय संचालक या पदावर बदली झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)

च्एम. श्ांकरनारायणन यांची नागपूर येथील वनमतीच्या महासंचालकपदावरून नागपूरच्या मनरेगाचे आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
च्सध्या मनरेगाच्या
आयुक्तपदी असलेले सचिन कुरवे यांची नागपूर येथील वनमतीच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली.

च्एम. पी. कल्याणकर यांची अकोला महापालिका आयुक्तपदावरून नागपूर येथील मायनिंग कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे.
च्ओमप्रकाश देशमुख यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदावर पी. व्ही. बनसोडे हे होते.

Web Title: KDMC Commissioner Replaces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.