एआयबी नॉकआऊटप्रकरणी करण जोहरला समन्स

By Admin | Updated: January 9, 2016 12:39 IST2016-01-09T11:42:37+5:302016-01-09T12:39:57+5:30

गेल्या वर्षी झालेल्या 'एआयबी नॉकआऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स बजावण्यात आले आहे

Karun Johar summoned for AIB knockout | एआयबी नॉकआऊटप्रकरणी करण जोहरला समन्स

एआयबी नॉकआऊटप्रकरणी करण जोहरला समन्स

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - गेल्या वर्षी झालेल्या 'एआयबी नॉकआऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाप्रकरणी ताडदेव पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स बजावण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान अश्लील कॉमेंट्स तसेच हावभाव केल्याचा आरोप करणवर लावण्यात आला असून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले आहे. 
गेल्या वर्षी वरळी येथे एआयबी नॉकआऊट हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात कलाकारांनी अश्लील व शिवराळ भाषा वापरली तसेच आक्षेपार्ह हावभाव केल्याने हा शो वादात सापडला होता. शिवाय, या कार्यक्रमासाठी सेन्सॉरची परवानगी घेण्यात आली नव्हती असा ठपकाही आयजोकांवर ठेवण्यात आला आहे.
एआयबी नॉकआऊटमध्ये करण जोहरसह अभिनेता रणवीर सिंह, अर्जुन कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. सहभागी प्रेक्षकांवर अश्लिल टिपण्णी करणे असाही आरोप यांच्यावर आहे. 

Web Title: Karun Johar summoned for AIB knockout