कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधी का मागितला?

By Admin | Updated: December 11, 2014 23:46 IST2014-12-11T23:22:23+5:302014-12-11T23:46:22+5:30

नाट्य संमेलन : संतप्त सीमावासीयांचा नाट्य परिषदेला सवाल

Karnataka ministers asked for fund? | कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधी का मागितला?

कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधी का मागितला?

बेळगाव : सीमाप्रश्न हा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संमेलनासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधीची मागणी करायला कशाला गेला होता? संमेलनासाठी निधी बेळगावकर मराठी भाषिकांनी गोळा करून दिला असता, असे सवाल संतप्त सीमावासीयांनी बेळगाव नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना केला.
बेळगाव नाट्य परिषदेच्या बैठकीनंतर ‘बेळगाव बिलॉँगस् टू महाराष्ट्र’ व ‘एकीकरण समिती’च्या कार्यकर्त्यांनी नाट्य परिषद बेळगावच्या अध्यक्ष वीणा लोकूर यांना जाब विचारला आणि मोहन जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याविषयी मला काही बोलायचे नाही, असे सांगून लोकूर निघून गेल्या.मोहन जोशीं वक्तव्याबद्दल नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने दिलगिरी व्यक्त करूनसुद्धा संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील सर्व साहित्य आणि नाट्यसंमेलनातून सीमाप्रश्नाचा ठराव केल्याशिवाय महाराष्ट्र सरकारने त्यांना आर्थिक मदत देऊ नये. याशिवाय सीमाप्रश्नाचा ठराव केल्याशिवाय नाट्यसंमेलन बेळगावात होऊ देणार नाही. जोशी यांनी माफी मागावी.
- टी. के. पाटील, उपाध्यक्ष, एकीकरण समिती



फेब्रुवारीमध्ये बेळगावात होणाऱ्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात सीमाप्रश्नाचा ठराव मांडत नाही, असे म्हणून मोहन जोशींनी मराठी अस्मितेचा अपमान केला आहे. त्यांना जर सीमावासीयांच्या भावनांची कदर नसेल, तर नाट्य परिषदेकडे मराठी बांधवांनी कळकळीने का पाहावे?
- प्रा. एन. डी. पाटील, सीमालढ्यातील ज्येष्ठ नेते

Web Title: Karnataka ministers asked for fund?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.