Join us  

कर्नाटकचे राज्यपाल आरएससएसचे कार्यकर्ते - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 5:00 PM

भाजपने भारताची लोकशाही धोक्यात आणून ठेवलेली आहे. राज्यपाल देश चालवत आहेत असे चित्र निर्माण झालेले आहे

मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की भाजपने लोकशाहीची पाळेमुळे उपटून काढलेली आहे. भाजपने भारताची लोकशाही धोक्यात आणून ठेवलेली आहे. राज्यपाल देश चालवत आहेत असे चित्र निर्माण झालेले आहे. गोवा, मणिपूर, मेघालय आणि आता कर्नाटकात राज्यपालांनी भाजपच्या दबावाखाली निर्णय दिलेले आहेत. राजभवन हे सत्ताधार्यांचा अड्डा बनलेला आहे. सर्व सूत्र राजभवन वरुन हलत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जोडगोळीने दबावतंत्र वापरून राज्यपालांना निर्णय घ्यायला भाग पाडलेले आहे. कर्नाटकचे राज्यपाल हे आरएससएसचे कार्यकर्ते आहेत. नरेंद्र मोदिच्या गुजरात मंत्रिमंडळात ते होते, त्यामुळेच बहुमत नसताना हि भाजपच्या बाजूने निकाल दिला. निवडणूक झाली की आमदार पळवायचे, पैसे वाटायचे, फोडाफोडीचे राजकारण करायचे, पोलिसांचा दबाव आणायचा, असले घाणेरडे राजकारण भाजप करत आहेत. काँग्रेसने असे कधीही केलेले नाही, आम्ही नेहमी लोकांचा कौल ऐकला, लोकांच्या निर्णयाचे स्वागत केले, काँग्रेस नेहमी लोकांच्या बाजूने उभे राहिली. काँग्रेसने लोकशाहीचा नेहमी आदर केलेला आहे. कर्नाटकात उद्या काँग्रेस बहुमत सिद्ध करेल असा मला संपूर्ण विश्वास आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. 

काँग्रेसतर्फे आज संपूर्ण देशामध्ये ‘लोकशाही वाचवा दिवस” – एक दिवसीय सांकेतिक धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. भाजपच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे सुद्धा अमर जवान ज्योति जवळ, आझाद मैदान जवळ ‘एक दिवसीय सांकेतिक धरणे आंदोलन’ करण्यात आले, त्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हे उद्गार काढले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार चरण सिंग सप्रा, आमदार भाई जगताप, उपस्थित होते. 

टॅग्स :कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८कर्नाटक निवडणूक निकाल २०१८अशोक चव्हाण