Join us  

Karnataka Election: 'EVM हा घोटाळाच, तो फक्त ३ ठिकाणी होतो'; आव्हाडांनी मांडलंय वेगळंच लॉजिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 12:04 PM

काँग्रेसने १३५ जागा जिंकत कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे, देशभरातून काँग्रेसच्या विजयाचं कौतुक आणि अभिनंदन केलं जातंय.

मुंबई - कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपचा मोठा पराभव झाला आहे. या विजयानंतर देशभरातून काँग्रेसचं कौतुक करण्यात येत आहे. तर, सोशल मीडियावरही काँग्रेस विजयानंतर समर्थकांनी भाजपची आणि मोदी-शहांची ही मोठी हार असल्याचा ट्रेंड सुरू केलाय. यास प्रत्युत्तर देताना भाजप समर्थकांकडूनही आपली बाजू मांडली जात आहे. भाजपचा युपी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील विजय सांगितला जातोय. तर, काँग्रेस जिंकल्यावर ईव्हीएम घोटाळा नसतो का? असाही प्रश्न उपस्तित केला जात आहे. आता, यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वेगळंच लॉजिक मांडलंय. 

काँग्रेसने १३५ जागा जिंकत कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे, देशभरातून काँग्रेसच्या विजयाचं कौतुक आणि अभिनंदन केलं जातंय. महाराष्ट्राती नेत्यांनीही काँग्रेसच्या या विजयाचं कौतुक करताना भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीव अमित शहांना लक्ष्य केलंय. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बजरंगबली सज्जनांसोबत आहे, तो दुर्जनांचं निकारण करतो, असे म्हणत भाजपला टोला लगावला. दरम्यान, या विजयानंतर ईव्हीएम मशिन पुन्हा चर्चेत आली आहे. आता, ईव्हीएम घोटाळा झाला नाही, असा प्रश्न भाजप समर्थकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे. त्यावर, जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच्या निवडणूक निकालानंतर ईव्हीएम घोटाळा असल्याचं विधान केलं होतं. तसेच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्यायला हव्यात, अशी मागणीही त्यांनी केली होती. आता, कर्नाटक निकालानंतरही त्यांनी ईव्हीएमचा घोटाळा असतोच, असं विधान केलंय. मात्र, हे विधान करताना त्यांनी वेगळंच लॉजिक लावलं आहे. ईव्हीएम घोटाळा हा फक्त तीन ठिकाणी नसतो. यांना राज्यांच्या निवडणुकांत नाही, तर लोकसभेच्या निवडणुकीत घोटाळा करायचाय, हा धूर्त घोटाळा आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. तसेच, गुजरात, उत्तर प्रदेश आणि लोकसभेच्या निवडणुकांवेळीच ईव्हीएम घोटाळा असतो, असा तर्क आव्हाड यांनी मांडला आहे. 

  

आव्हाड यांनी व्हिडिओ ट्विट करत ईव्हीएम हा घोटाळा असतोच असे म्हटले. तसेच, नो ईव्हीएम, बॅक टू बॅलेट पेपर असंही त्यांनी म्हटलंय.

टॅग्स :कर्नाटक विधानसभा निवडणूकएव्हीएम मशीनजितेंद्र आव्हाड