कर्जत - पुणे शटल २४ जानेवारीपर्यंत रद्द

By Admin | Updated: January 17, 2016 01:26 IST2016-01-17T01:26:59+5:302016-01-17T01:26:59+5:30

कर्जत रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम रविवार १७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी कर्जत स्थानकात मेगाब्लॉक

Karjat-Pune shuttle canceled till Jan 24 | कर्जत - पुणे शटल २४ जानेवारीपर्यंत रद्द

कर्जत - पुणे शटल २४ जानेवारीपर्यंत रद्द

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम रविवार १७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी कर्जत स्थानकात मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे दुपारी चार तास सर्व लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय कर्जत-पुणे ही शटल २४ जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. कर्जत स्थानकात नवीन पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी रविवारी सकाळी ११.२० ते ३.२० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

Web Title: Karjat-Pune shuttle canceled till Jan 24