कर्जत ते पाली एसटी पलटी
By Admin | Updated: June 23, 2015 23:21 IST2015-06-23T23:21:36+5:302015-06-23T23:21:36+5:30
कर्जत येथून सकाळी सुटणाऱ्या कर्जत-पाली या एसटीला वाकण-पाली राज्य महामार्गावर खुरावले फाट्याजवळ मंगळवारी सकाळी सुमारे साडेसात वाजता

कर्जत ते पाली एसटी पलटी
पाली : कर्जत येथून सकाळी सुटणाऱ्या कर्जत-पाली या एसटीला वाकण-पाली राज्य महामार्गावर खुरावले फाट्याजवळ मंगळवारी सकाळी सुमारे साडेसात वाजता अपघात झाला. बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.
बसमध्ये यावेळी जवळपास पन्नास ते साठ महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि चाळीस ते पंचेचाळीस असे शंभराच्या वर प्रवासी होते. अपघातात सात ते आठ जणांना किरकोळ दुखापत वगळता बाकी कोणासही लागले नाही.
अपघाताचे वृत्त कळताच वाहतूक नियंत्रक व इतर अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. या बसमधील प्रवाशांना मुख्य दरवाजा उघडून बाहेर काढण्यात आले.
दुपारी पेण येथील नियंत्रक अभियंता ए. एन. मोहिते यांनी भेट देऊन गाडीची पाहणी केली असता ते म्हणाले की, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात जोरात चाक आदळल्याने स्प्रिंग तुटली व गाडीवरील चालकाचा ताबा सुटला. चालक एस. के. पवार यांनी प्रसंगावधान राखून गाडी रोखली परंतु साईडपट्टीला ओली माती असल्याने बसचे टायर रुतले व गाडी पलटी झाली. (वार्ताहर)