कर्जत-कल्याण रस्ता होणार हिरवागार
By Admin | Updated: August 13, 2015 00:01 IST2015-08-13T00:01:17+5:302015-08-13T00:01:17+5:30
तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जत-कल्याण रस्त्याच्या ३५ किलोमीटर भागात श्री सदस्यांनी विविध वनस्पतींची लागवड केली. ४००० झाडांची लागवड

कर्जत-कल्याण रस्ता होणार हिरवागार
कर्जत : तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जत-कल्याण रस्त्याच्या ३५ किलोमीटर भागात श्री सदस्यांनी विविध वनस्पतींची लागवड केली. ४००० झाडांची लागवड आणि संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
कर्जत-कल्याण रस्त्यावरील कर्जत चारफाटा ते डोणे फाटा या रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड कार्यक्र म डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने हाती घेतला. ३५ किलोमीटरच्या भागात झाडे लावण्यासाठी खड्डे खोदणे, झाड लावून झाल्यानंतर त्याला संरक्षण म्हणून जाळी लावणे, पुढील वर्षभर त्या झाडाला पाणी घालण्याची जबाबदारी कर्जत तालुक्यातील श्री सदस्यांनी घेतली आहे. या
कार्यक्र माची सुरु वात कर्जत चारफाटा येथे झाडे लावून झाली.
कर्जत चारफाटा येथे वृक्ष लागवड कार्यक्र म झाल्यानंतर कर्जतपासून डोणेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा तालुक्यातील सुमारे वीस हजार सदस्यांनी चार हजार झाडांची लागवड केली. प्रत्येक झाड लावण्यासाठी चार श्रीसदस्यांनी श्रमदान केले. या मोठ्या कार्यक्र माचे नियोजन करताना डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाडे, त्यांना संरक्षण म्हणून जाळी लावण्यासाठी बांबूच्या काठ्या आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी राज्य विधिमंडळाचे उपसचिव सुभाष मयेकर, पोलीस उपअधीक्षक शालिग्राम पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
श्री सदस्य घेणार झाडांची काळजी
जी झाडे जगणार नाहीत त्या ठिकाणी पुढील दीड दोन महिन्यांत नवीन झाडे लावली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पुढील पावसाळ्यापर्यंत झाडे सुकून जाणार नाहीत याची काळजी त्या त्या भागातील श्री सदस्य घेणार आहेत. मंगळवारी झालेल्या वृक्ष लागवड कार्यक्र मानंतर कर्जत-कल्याण रस्ता झालेला काही काळातच हिरवागार झालेला पाहावयास मिळणार आहे.