कर्जतची निवडणूक चुरशीची
By Admin | Updated: October 10, 2014 23:09 IST2014-10-10T23:09:52+5:302014-10-10T23:09:52+5:30
कर्जत विधानसभा निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची बनली आहे. काही उमेदवार जाहीर तर काही छुपा प्रचार करीत आहेत.

कर्जतची निवडणूक चुरशीची
खालापूर : कर्जत विधानसभा निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची बनली आहे. काही उमेदवार जाहीर तर काही छुपा प्रचार करीत आहेत. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याने राजकीय विश्लेषकही बुचकळ्यात पडल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड आणि उद्योजक हनुमंत पिंगळे अशी खरी निवडणूक असली तरी भाजपा आणि शेकापचेही मोठे आव्हान आहे. कर्जत मतदार संघ हे पूर्वापार सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, परंतु सध्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.
कर्जतसह खालापूर येथे सेनेची पाळेमुळे अधिक घट्ट असल्याने ग्रामीण कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर सेनेने नेहमीच वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. प्रमुख पाच पक्षांचे उमेदवार यंदा एकमेकांसमोर असल्याने सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा सामन्यात आता शेकाप, भाजपा देखील अधिक जोमाने आत्मविश्वासाने कामाला लागल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेकाप उमेदवार महेंद्र थोरवे यांनी प्रचारात मुसंडी घेतली आहे तर अत्यंत छुप्या पद्धतीने भाजपाचे उमेदवार राजेंद्र येरु णकर यांचा प्रचार सुरु आहे. सेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे आणि राष्ट्रवादीचे लाड या प्रमुख लढतीमध्ये शेकाप आणि भाजपाच्या उमेदवारांनी आव्हान उभे केल्याने याचा नेमका फायदा आाणि फटका कुणाला बसणार याचीच जोरदार चर्चा नाक्यानाक्यावर सुरु आहेत.