मराठी मुलीच्या भूमिकेत करिना

By Admin | Updated: June 21, 2014 23:02 IST2014-06-21T23:02:36+5:302014-06-21T23:02:36+5:30

रि फ्युजी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा:या करिना कपूरने एक दशकात करिअरचा मोठा पल्ला गाठला आहे.

Kareena as a Marathi girl | मराठी मुलीच्या भूमिकेत करिना

मराठी मुलीच्या भूमिकेत करिना

>रि फ्युजी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा:या करिना कपूरने एक दशकात करिअरचा मोठा पल्ला गाठला आहे. करिनाच्या मते तिला वेगवेगळ्या भूमिका साकारायला आवडतात, कारण चित्रपट निवडतानाच ती जोखीम पत्करत असते. सिंघम रिटर्न्‍समध्ये करिना एका मराठमोळ्या तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी करिना या चित्रपटात वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. याबाबत बोलताना करिना म्हणाली की, ‘ एका कलाकाराचे हे कर्तव्य आहे की, त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारायला हव्यात. 
सर्वच बाबतीत धाडसी होण्याची गरज असते. मला जोखीम पत्करायला आवडते. मला फक्त नाच-गाण्याचे चित्रपट करायचे नाहीत.’

Web Title: Kareena as a Marathi girl