Join us

करीना कपूरनं सैफ अली खानला लग्नासाठी दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 11:53 IST

करीना कपूरनं नाकारलं होतं सैफ अली खानचं प्रपोजल...

मुंबई - बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि छोटे नवाब सैफ अली खान सिनेसृष्टीतील पॉवर कपल मानलं जाते. हे पॉवर कपल कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. या दोघांचं लग्न होऊन बराच काळ लोटला आहे. सोबतच त्यांचा मुलगा तैमुर आता सर्वांचाच लाडका झाला आहे. मात्र, या दोघांची अशी एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे. ज्यावेळी पहिल्यांदा सैफनं करीनाला लग्नासाठी प्रपोज केले होते, त्यावेळी तिनं सैफला नकार दिला होता.

'टशन' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान करीना आणि सैफ एकमेकांच्या जवळ आले होते. याबाबत करीनानं सांगितले की, ''प्रेम व्यक्त करण्यासाठी सैफ कधीही स्वतःहून पुढाकार घेणार नाही, हे मला माहिती होते. म्हणून माझ्या परिनं मी सर्व ते प्रयत्न केले. जेव्हा माझे प्रेम मी व्यक्त केले त्यावेळी करीना कपूर असं काही करतेय, यावर माझा विश्वास बसत नाही, असे सैफनं म्हटले होते.'' शुटिंगनिमित्त आम्ही पॅरिसमध्ये एकत्र होतो. त्यावेळेस सैफनं लग्नासाठी प्रपोज केल्याचं करीनानं सांगितलं. एका मुलाखतीदरम्यान करीनानं आपल्या लग्नाची गोष्ट सविस्तरपणे मांडली. 

याबाबत करीनाने सांगितले की, 'आम्ही पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये असताना सैफनं मला लग्नासाठी पहिल्यांदा प्रपोज केलं. तेव्हा ते प्रपोजल मी स्पष्टपणे नाकारलं. यानंतर नॉट्रे डेम चर्चमध्ये असताना त्यानं पुन्हा मला लग्नाची मागणी घातली.  माझ्यासमोर माझ्या करिअरचा विषय असल्यानं याबाबत बोलणी होऊ नये, असा विचार माझ्या डोक्यात सुरू होता. मात्र, सैफनं मला प्रपोज केले आणि यानंतर काही वेळानं विचार करुन मी लगेचच त्याला होकार दिला. 

दरम्यान, पॅरिसमध्येच 'एन इवनिंग इन पॅरिस' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सैफचे वडील आणि क्रिकेटर नवाब पतौडी अली खान यांनी शर्मिला टागोर यांना प्रपोज केले होते. 

लग्नानंतर सैफीनाला बॉलिवूडमधील यशस्वी जोडपे मानलं जातं.  लग्नानंतरही दोघांचं करिअर पूर्वीप्रमाणेच योग्यरित्या सुरू आहे. लग्न व गरोदरपणानंतरही करीनानं सिल्व्हर स्क्रीनवरील आपला जलवा कायम राखलाय.

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूर