कराटे बेल्ट प्रमाणपत्र वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:09 IST2021-03-04T04:09:50+5:302021-03-04T04:09:50+5:30

मुंबई : एशिएन शितो-रियो स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन (शाखा पवई) तर्फे कराटे विद्यार्थ्यांची कलर बेल्ट ...

Karate Belt Certificate Distribution | कराटे बेल्ट प्रमाणपत्र वितरण

कराटे बेल्ट प्रमाणपत्र वितरण

मुंबई : एशिएन शितो-रियो स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन (शाखा पवई) तर्फे कराटे विद्यार्थ्यांची कलर बेल्ट परीक्षा व त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुक्तेश्वर आश्रम, आयआयटी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. स्मिता डोंगरे व मुक्तेश्वर आश्रमचे सचिव चंद्रशेखर दाभोळकर, आयआयटीचे प्रोफेसर प्रसेनजीत भौमिक, एशिएन शितो-रियो कराटेचे चीफ कराटे मास्टर कोयशी संजय गव्हाळे, सेन्सेई रझी सिद्धिकी उपस्थित होते. सर्व परीक्षार्थिनी परीक्षा देत कराटे बेल्ट व प्रमाणपत्र प्राप्त केले. यात प्रियाशा भौमिक (सिल्व्हर ब्राउन), धनाश्री जबाडे (ब्राउन बेल्ट), सुनाक्षी जोहरे (जांभळा बेल्ट), अंशुमन नेगी (ब्लू बेल्ट), शौर्य शिंदे (ग्रीन बेल्ट), मुद्रा चौधरी (ग्रीन बेल्ट), सारिका देशपांडे (ग्रीन बेल्ट), राजरून डी. शिंदे (आरेंज बेल्ट), अंश जाधव (आरेंज बेल्ट), अंशिता जाधव (आरेंज बेल्ट), प्रतिष्ठा भैमक (यलो बेल्ट), अनिकेत कुलकर्णी (यलो बेल्ट) यांचा समावेश आहे.

Web Title: Karate Belt Certificate Distribution