करण जोहरसह अर्जुन कपूरला बजावले समन्स
By Admin | Updated: January 10, 2016 01:50 IST2016-01-10T01:50:05+5:302016-01-10T01:50:05+5:30
हिंदी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता अर्जुन कपूरला ताडदेव पोलिसांनी ‘एआयबी नॉकआऊट’ प्रकरणी समन्स बजावले आहे. कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केल्याचा

करण जोहरसह अर्जुन कपूरला बजावले समन्स
मुंबई : हिंदी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता अर्जुन कपूरला ताडदेव पोलिसांनी ‘एआयबी नॉकआऊट’ प्रकरणी समन्स बजावले आहे. कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
‘एआयबी नॉकआऊट’ या कार्यक्रमात अश्लील शब्द वापरल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. या कार्यक्रमासाठी सेन्सॉरची परवानगीही घेतली नसल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आला. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, करण जोहर परदेशात असल्याने हजर होऊ शकत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी पोलिसांना सांगितले आहे.