कविता करकरे यांचा करुण अंत
By Admin | Updated: September 29, 2014 21:47 IST2014-09-29T21:47:19+5:302014-09-29T21:47:19+5:30
कविता करकरे यांचा करुण अंत

कविता करकरे यांचा करुण अंत
क िता करकरे यांचा करुण अंतमृत्यूनंतर केले अवयव दानमुंबई: मुंबईवर झालेल्या २६ / ११ च्या दशहतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता हिंदुजा रुग्णालयात ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यांचा मेंदू मृतावस्थेत असला तरी ही इतर अवयव कार्यरत होते, म्हणून त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांचे डोळे, किडनी, यकृत आणि त्वचा दान करण्याचा निर्णय घेतला. कविता करकरे या ५७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या डोक्याला जबर जखम झाल्यामुळे शनिवारी सकाळी त्यांना माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळेपासूनच त्या बेशुद्धावस्थेत होत्या. रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचे हृदयाचे कार्य नियमित सुरू राहण्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. यानंतर कविता करकरे यांच्या इतर काही तपासण्या करण्यात आल्यावर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. त्यांना व्हेंटिलेटलवर ठेवण्यात आले होते. काहीतरी चमत्कार होईल आणि त्यांच्यात सुधारणा होईल, असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना आणि डॉक्टरांना वाटत होता. मात्र मंगळवार सकाळपर्यंत त्यांच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसून आली नाही. यानंतर त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यानंतर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यावेळी त्यांची तिन्ही मुले तिथेच होती. आई गेली, मात्र ज्यांना अवयवांची गरज आहे, त्यांना मदत व्हावी, याच हेतूने आईच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय तिन्ही मुलांनी मिळून घेतला. कविता करकरे यांचे डोळे, त्वचा, यकृत, किडनी हे अवयव दान करण्यात आले आहेत. कविता करकरे यांची यकृत कोकिलाबेन रुग्णालयात देण्यात आले आहे. एक किडनी हिंदुजा रुग्णालयातच देण्यात आली असून दुसरी किडनी ही जसलोक रुग्णालयाला देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)