कपिलच्या कॉमेडीची पाकिस्तानलाही भुरळ!

By Admin | Updated: May 12, 2014 17:20 IST2014-05-12T17:20:35+5:302014-05-12T17:20:35+5:30

भारताचा सुप्रसिध्द हास्यकलाकार कपिल शर्मा सध्या पाकिस्तानातही चांगलाच लोकप्रिय ठरत आहे.

Kapil's comedy is fascinated by Pakistan! | कपिलच्या कॉमेडीची पाकिस्तानलाही भुरळ!

कपिलच्या कॉमेडीची पाकिस्तानलाही भुरळ!

>ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १२ - भारताचा सुप्रसिध्द हास्यकलाकार कपिल शर्मा सध्या पाकिस्तानातही चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. कपिलच्या कॉमेडिने अनेकांना भुरळ घातली असून ही भुरळ पाकिस्तानलाही पडली आहे. 
"कॉमेडी नाइट्स विद कपिल" या कार्यक्रमाने देशभर हास्याची लहर उमटवली असून या कार्यक्रमामुळे कपिल शर्मा चांगलाच हिट ठरला आहे. कपिल शर्माची देशात जी लोकप्रियता आहे ती पाकिस्तानातही दिसत आहे. याच लोकप्रियतेतून कराची येथील रस्त्यावर कपिल शर्माचे भले मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टरचे छायाचित्र कपिल शर्माने आपल्या फेसबुकवर टाकले असून पाकिस्तानमध्ये पोस्टर लावले असल्याने आपल्याला आनंद झाल्याचे कपिलने फेसबुकवर म्हटले आहे. "कॉमेडी नाइट्स विद कपिल" मध्ये दिसणारा कपिल लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार असून यशराज फिल्मसच्या बॅनरखाली बनवण्यात येणा-या 'बँक चोर' या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

Web Title: Kapil's comedy is fascinated by Pakistan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.