मुलुंडमधील कन्नड, तुळू समाज काँग्रेसच्या पाठीशी
By Admin | Updated: October 8, 2014 01:55 IST2014-10-08T01:55:01+5:302014-10-08T01:55:01+5:30
मुलुुंडमधील कन्नड व तुळू समाजाने येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे

मुलुंडमधील कन्नड, तुळू समाज काँग्रेसच्या पाठीशी
मुंबई : मुलुुंडमधील कन्नड व तुळू समाजाने येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ५ आॅक्टोबर रोजी मुलुंड चेकनाक्याजवळील सेलीबे्रशन हॉलमध्ये कर्नाटक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे नगरविकास मंत्री विनयकुमार सोरके, सांस्कृतिक मंत्री अभयचंद्र जैन, माजी खासदार जयप्रकाश हेगडे, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य सी.व्ही. मोहन, मुलुंड बंटस कमिटीचे अध्यक्ष सत्यप्रकाश शेट्टी, मुलुंड
बिल्वा असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कुमार, मुलुंड मोगाविरा असोसिएशनचे अध्यक्ष महाबल कुंदन आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मुलुंड बंटस कमिटीचे
सदस्य जयप्रकाश शेट्टी यांनी केले होते.
या कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सदस्य आणि मुलुंडमधील काँग्रेसचे उमेदवार चरणसिंग सप्रा यांचा, त्यांनी केलेल्या समाजकार्याबाबत गौरव करण्यात आला. सप्रा यांनी मुलुंड परिसरात, मुलुंडमधील प्रत्येक समाजासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख या वेळी आयोजकांनी केला तेव्हा उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सप्रांचे स्वागत केले. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देऊ, असे आश्वस्त केले. (प्रतिनिधी)