कंगना रनौतचा जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:07 IST2021-03-26T04:07:42+5:302021-03-26T04:07:42+5:30

जावेद अख्तर मानहानी दावा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने ...

Kangana Ranaut granted bail | कंगना रनौतचा जामीन मंजूर

कंगना रनौतचा जामीन मंजूर

जावेद अख्तर मानहानी दावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाचा जामीन मंजूर केला. गुरुवारी कंगना अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात स्वतः उपस्थित होती.

समन्स बजावूनही कंगना १ मार्च रोजी उपस्थित न राहिल्याने अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी तिच्याविरोधात अटकपात्र जामीन जारी केले. त्यानंतर तिने जामिनासाठी अर्ज केला. गुरुवारी न्यायालयाने तो मंजूर केला. जावेद अख्तर यांनी केलेल्या तक्रारीत सकृतदर्शनी तथ्य असल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाने कंगनाला समन्स बजावले.

अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगनाने अर्णव यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील ‘सुसाइड गॅंग’मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले आहे. तिच्या या आरोपांमुळे जावेद यांची प्रतिमा मलिन झाली. यू-ट्यूबवर ही क्लिप खूप पसरली, असे अख्तर यांनी याचिकेत नमूूद केले.

Web Title: Kangana Ranaut granted bail