Join us  

कंगनाने अनधिकृत बांधकाम केले, कारवाई योग्यच ; मुंबई महापालिकेची हायकोर्टात भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 1:24 AM

‘न्यायालयाने निर्देश दिल्यावर पालिकेने तत्काळ कारवाई थांबवली.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या बंगल्यावर हेतुपूर्वक कारवाई केली नाही. तिने बंगल्यात अनधिकृत बांधकाम केले. खुद्द याचिकाकर्तीनेही याचिकेत वादग्रस्त बांधकाम अनधिकृत नसल्याबाबत म्हटले नाही. त्यामुळे पालिकेने केलेली कारवाई योग्य आहे, अशी भूमिका मुंबई महापालिकेने उच्च न्यायलयात गुरुवारी घेतली. 

पालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील पाली हिल बंगल्यावर कारवाई केल्याने तिने या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठा पुढे सुनावणी होती. गुरुवारच्या सुनावणीत पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील (अ‍ॅस्पी) चिनॉय यांनी न्यायालयाला सांगितले की, तिने बंगल्यात बांधकामाबाबत केलेल्या सुधारणा नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्या आहेत.

‘न्यायालयाने निर्देश दिल्यावर पालिकेने तत्काळ कारवाई थांबवली. त्याचप्रमाणे याचिकाकर्तीलाही बंगला जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत,’ अशी विनंती चिनॉय यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी ठेवली. कंगनाला ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावली तेव्हाही तिने बांधकाम बेकायदा असल्याचे नाकारले नाही. कारवाईसाठी गेलेला एकही अधिकारी बंगल्यात जबरदस्तीने घुसला नाही किंवा तेथील सुरक्षारक्षकांशी किंवा अन्य कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले नाही, असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :कंगना राणौतमुंबई महानगरपालिकाउच्च न्यायालय