पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे कांदिवलीत पतीची आत्महत्या

By Admin | Updated: May 11, 2017 01:45 IST2017-05-11T01:45:45+5:302017-05-11T01:45:45+5:30

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवलीत घडली आहे. किशोर प्रजापती (२५) असे त्याचे नाव आहे.

Kandivalyat husband's suicide due to wife's immoral relationship | पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे कांदिवलीत पतीची आत्महत्या

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे कांदिवलीत पतीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवलीत घडली आहे. किशोर प्रजापती (२५) असे त्याचे नाव आहे. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे त्याच्या आत्महत्येमागचे गूढ समोर आले. याप्रकरणी समतानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मूळचा राजस्थानचा रहिवासी असलेल्या प्रजापतीचे मुंबईत दुकान आहे. तो पत्नीसोबत कांदिवली परिसरात राहायचा. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकरला रंगेहाथ पकडले. तेव्हापासून दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. रविवारीही त्यांच्यात भांडण झाले. याच रागात पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर त्याने घरात विष पिऊन आत्महत्या केली. बराच वेळ प्रजापती फोनला प्रतिसाद देत नसल्याने पत्नीने रात्री ११ च्या सुमारास घर गाठले. तेव्हा प्रजापती मृतावस्थेत आढळला. पत्नीकडून त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच समतानगर पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतदेहाजवळून पोलिसांनी हिंदीमध्ये लिहिलेली एक सुसाईड नोटही ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये प्रजापतीने पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तसेच पत्नीसह तिचा प्रियकराला शिक्षा देण्याचेही या सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे. शिवाय त्याने सुसाईड नोटवर पत्नीच्या प्रियकराचा फोटोही चिटकवल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

Web Title: Kandivalyat husband's suicide due to wife's immoral relationship