कांदिवलीत झोपडपट्टीस आग
By Admin | Updated: November 19, 2015 21:45 IST2015-11-19T21:21:01+5:302015-11-19T21:45:18+5:30
कांदिवली येथील एम. जी. रोड परिसरातील वृंदावन हॉस्पिटल जवळच्या झोपडपठ्टीस भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे ६ बंब रवाना झाले आहेत

कांदिवलीत झोपडपट्टीस आग
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - कांदिवली येथील एम. जी. रोड परिसरातील वृंदावन हॉस्पिटल जवळच्या झोपडपठ्टीस भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे ६ बंब रवाना झाले आहेत, आग विजवण्याचे अटोक्याचे पर्यंत्न सुरु आहेत.
एम. जी. रोड जवळील स्विमिंग पुलाच्या समोर अवैध पद्धतीने चालू असणाऱ्या हॉटेल मध्ये एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, त्या गॅस सिलेंडरच्या बाजूला असणारे २-३ गॅस सिलेंडरही फुटल्यामुळे आगीचे भीषण स्वारुपात रुपांतर झाल्याचे समजते.
या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी अथवा मोठं नुकसान झाले नाही, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब रवाना झाले घटनास्थळी पोहोचले आणि आग विजवण्याचा अटोक्याचा पर्यंत्न करत आहेत.