कांदिवलीत ५१ लाखांची पर्यावरण दहीहंडी
By Admin | Updated: August 17, 2014 23:54 IST2014-08-17T23:10:29+5:302014-08-17T23:54:59+5:30
पर्यावरणाचे रक्षण करा, वृक्षतोड थांबवा-पर्यावरण वाचवा, असे संदेश देणारी ५१ लाखांची पर्यावरण दहीहंडी कांदिवली(पूर्व) मागठाणे,देवीपाडा येथे बांधण्यात येणार आहे.

कांदिवलीत ५१ लाखांची पर्यावरण दहीहंडी
अंधेरी: पर्यावरणाचे रक्षण करा, वृक्षतोड थांबवा-पर्यावरण वाचवा, असे संदेश देणारी ५१ लाखांची पर्यावरण दहीहंडी कांदिवली(पूर्व) मागठाणे,देवीपाडा येथे बांधण्यात येणार आहे. ही हंडी फोडण्यासाठी मुंबई-ठाणे परिसरातील ४०० पथके सकाळी १० च्या सुमारास रेन डान्सवर सलामी देणार आहेत. थर लावणार्या गोविंदा पथकांना यावेळी रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल.
दहीकाल्याचा आनंद घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष संजय पाटील,माजी खासदार डॉ.संजीव नाईक, आमदार किरण पावसकर, सिनेअभिनेत्री पल्लवी सुभाष, प्रिया बापट,अरुण कदम, कमलाकर सातपुते, मानसी नाईक यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँॅंग्रेस पार्टीचे उत्तर मुंबई अध्यक्ष प्रकाश सुर्वे यांनी या दहीकाल्याचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)