कंचन छाब्रिया रुग्णालयात दाखल,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:34+5:302021-02-05T04:28:34+5:30
तर निहाल बजाजला एक दिवसाची कोठडी कपिल शर्मा फसवणूक प्रकरण : कंचन छाब्रिया रुग्णालयात दाखल कपिल शर्मा फसवणूक प्रकरण ...

कंचन छाब्रिया रुग्णालयात दाखल,
तर निहाल बजाजला एक दिवसाची कोठडी
कपिल शर्मा फसवणूक प्रकरण :
कंचन छाब्रिया रुग्णालयात दाखल
कपिल शर्मा फसवणूक प्रकरण : निहाल बजाजला एक दिवसाची कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हास्य कलाकार कपिल शर्मा फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या डी. सी. डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांची बहीण कंचन हरिकिशनदास छाब्रिया यांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांना गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर निहाल बजाजला एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.
डी. सी. अवंती कार घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या दिलीप छाब्रियाने कपिल शर्माला व्हॅनिटी व्हॅन बनवून देतो, असे सांगून ५ कोटी ३२ लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा आहे. ताे गुन्हे शाखेकडे वर्ग होताच, या गुन्ह्यात छाब्रियाला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ दिलीप छाब्रिया डिझाइन कंपनीची डायरेक्टर असलेली त्याची बहीण कंचन आणि याच कंपनीत सेल प्रमुख असलेल्या निहाल बजाजला बुधवारी अटक करण्यात आली.
गुरुवारी कंचन यांना मधुमेहाचा त्रास झाल्याने वैद्यकीय तपासणीसाठी गोकुळदास तेजपाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण अधिक आढळून आल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर बजाजला एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडे कपिल शर्मासंदर्भात झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे.
.................