कोमसापचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर, २२ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा

By Admin | Updated: November 15, 2015 02:02 IST2015-11-15T02:02:20+5:302015-11-15T02:02:20+5:30

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कोकणातील साहित्यिकांना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाङ्मय, संकीर्ण

Kamsaap's literary award, the award distribution ceremony on November 22 | कोमसापचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर, २२ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा

कोमसापचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर, २२ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कोकणातील साहित्यिकांना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाङ्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक, एकांकिका, दृकश्राव्य, कला, सिनेमा या साहित्य प्रकारांमध्ये देण्यात येणारे पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले.
प्रथम पुरस्कार पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह तर द्वितीय क्रमांकाचे विशेष पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह असे आहे. या सर्व पुरस्कारांचे वितरण कोमसापच्या रौप्यमहोत्सवी वर्षात होत असलेल्या १६ व्या साहित्य संमेलनात राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे २२ नोव्हेंबर या दिवशी प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदा कादंबरीसाठी र. वा. दिघे स्मृती पुरस्कार अशोक समेळ (मी अश्वत्थामा चिरंजीव), वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार प्रा. चंद्रकांत मढवी (उधळ्या), कथासंग्रह वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार स्टीफन परेरा (पोपटी स्वप्न), विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार मनीष पाटील (माह्यावाल्या गोष्टी), कविता आरती प्रभु स्मृती पुरस्कार शशिकांत तिरोडकर (शशीबिंब), वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार रेखा कोरे (वास्तवाच्या उंबरठ्यावर ), धनंजय कीर स्मृती विशेष पुरस्कार मोहन गोरे (आनंदयात्रा), श्रीकांत शेट्ये स्मृती विशेष पुरस्कार डॉ. भगवान कुलकर्णी (आॅनरेबली अ‍ॅक्विटेड) यांना जाहीर करण्यात आला आहे. समीक्षा ग्रंथ प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार यंदाच्या वर्षी कुणालाही मिळालेला नाही.
त्याचप्रमाणे, ललित गद्य अनंत काणेकर स्मृती पुरस्कार नीला सत्यनारायण (टाकीचे घाव), लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार रेखा नार्वेकर (आनंदतरंग), बालवाङ्मय प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार डॉ. विद्याधर करंदीकर (नाथ पै असाही एक लोकनेता). संकीर्ण वाङ्मय वि. कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार डॉ. गोपीनाथ सारंग (झाकोळलेले कोकण), अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार डॉ. विद्या जोशी (आरोग्यासाठी मनाचे श्लोक), दृकश्राव्य कला सिनेमा भाई भगत स्मृती पुरस्कार दिवाकर गंधे (चित्रगंध), नाटक एकांकिका रमेश कीर पुरस्कार विनोद पितळे (बाय द वे) यांना हे पुरस्कार संमेलनादरम्यान प्रदान करण्यात येणार आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Kamsaap's literary award, the award distribution ceremony on November 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.