Join us  

Gurudas Kamat Death: कामत यांच्या निधनानं उत्कृष्ट संघटक व सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता गमावला- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:23 AM

Gurudas Kamat Death: माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनाने एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनाने एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणालेत, कामत यांचा मुंबईतील सर्व स्तरातील नागरिकांशी अतिशय निकटचा संबंध होता. तसेच या महानगरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते सातत्याने आग्रही असत. उत्कृष्ट संघटन कौशल्यासोबत अभ्यासू आणि सडेतोड भूमिका घेणाऱ्या कामत यांचे राजकारणासोबत विविध क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे. आपल्या पक्षासह केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे  सांभाळल्या  होत्या. त्यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय क्षेत्राने सर्वसामान्यांशी जोडलेला एक महत्त्वाचा नेता गमावला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधनकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे शेवटचे ट्विटएक लढवय्या कार्यकर्ता गेलाकॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या दुःखद निधनाने एक लढवय्या कार्यकर्ता गेला आहे.कार्यकर्त्यांशी खूप जवळीक असलेला आणि त्यांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होत असत. विद्यार्थी दशेतूनच आपल्या राजकीय कार्याला त्यांनी सुरवात केली होती.आयुष्यात संघर्ष करून ते काँग्रेसच्या जेष्ठ नेतेपदी विराजमान झाले होते. त्यांच्या दुःखद निधनाने काँग्रेस पक्षाचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी भरून काढता येणार नाही. मी व माझ्या भाजपा पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना करतो.गोपाळ शेट्टी, खासदार, उत्तर मुंबई----------------------------दुःखद निधन झाल्याचे समजल्यावर मला धक्का बसलाकाँग्रेसचे जेष्ठ नेते गुरुदास कामत यांचे आज सकाळी दुःखद निधन झाल्याचे समजल्यावर मला धक्का बसला.आमचे राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी आमची दोघांची जुनी मैत्री होती.मी खासदार नसतांना त्यांच्या डी. एन.नगर येथील कार्यालयात एका कामानिमित्त गेलो असतांना त्यांनी मला सहकार्य केले होते.दिल्लीत आल्यावर कधी आमची भेट व गप्पा होत असत.त्यांच्या दुःखद निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले असून त्याची पोकळी भरून काढता येणार नाही.गजानन कीर्तिकर, खासदार, उत्तर पश्चिम मुंबई 

टॅग्स :गुरुदास कामत