Join us

कामाठीपुऱ्याचे क्लस्टर डेव्हलपमेंट, म्हाडाने निविदा काढली; आठ हजार भाडेकरूंना लाभ, लॉटरीसाठीही घरे उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:42 IST

Mumbai News: गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येथे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची म्हणजे खासगी विकासक नेमण्यासाठी म्हाडाकडून निविदा काढण्यात आली आहेत.

मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येथे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची म्हणजे खासगी विकासक नेमण्यासाठी म्हाडाकडून निविदा काढण्यात आली आहेत. हा पुनर्विकास लवकरात लवकर मार्गी लागला तर याचा फायदा सुमारे परिसरातील ८ हजार भाडेकरूंना होणार असून, म्हाडाला याद्वारे लॉटरीसाठी सुमारे १ हजार घरे मिळणार आहेत.

दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या ३४ एकर जागेवरील कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक १ ते १५ या भागात सुमारे ९४३ उपकरप्राप्त इमारती आहेत. यामध्ये ६,६२५ निवासी व १,३७६ अनिवासी असे एकूण ८००१ भाडेकरू/रहिवासी आहेत. तर ८०० जमीन मालक आहेत. या क्षेत्रातील इमारती १०० वर्षे जुन्या आहेत. तसेच संपूर्ण भागातील भूखंडाचे क्षेत्रफळ ७३,१४४.८४ चौरस मीटर आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ८,००१ भाडेकरू/रहिवाशांना कायमस्वरूपी हक्काचे घर मिळणार आहे.

महापालिकेच्या काही जागा किंवा काही मालमत्ता येथे असल्याने महापालिकेने या पुनर्विकासात रस दाखविला होता. मात्र कित्येक महिने त्याबाबत महापालिकेनेही काही हालचाल केली नाही. त्यामुळे हा प्रकल्प म्हाडाच राबविणार हे निश्चित झाले होते.

म्हाडाने काढलेल्या निविदेनुसार १२ जून ते २८ जुलैदरम्यान इच्छुकांना प्रस्ताव सादर करता येतील. त्यानंतर पुढील प्रक्रिया म्हाडा प्रशासनाकडून सुरू करण्यात येईल. 

प्रकल्पाचा तपशील...बहुतांशी इमारती ८० ते १०० वर्षे जुन्या.५३ मजली इमारती उभारण्याची योजना.रस्ते, उद्याने, मैदानांच्या सुविधा.सुमारे १५ हजार कोटींहून अधिक खर्च.रहिवाशांना किमान ५०० चौरस फुटांचे घर.  

अरुंद भूखंड, चाळींची घनता अधिकरेड लाइट डिस्ट्रिक्ट म्हणून ओळख असलेला कामाठीपुरा असंख्य सामाजिक चळवळीचा देखील साक्षीदार राहिला आहे. येथे अरुंद भूखंड असून चाळींची घनता जास्त आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे आव्हान आहे. 

जमीन मालकांना काय ?५० चौ.मी क्षेत्रफळाच्या भूखंडासाठी ५०० फुटांचे घर५१ चौ.मी. ते १०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भुखंडासाठी ५०० फुटांची दोन घरे१०१ चौ.मी. ते १५० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भुखंडासाठी ५०० फुटांची तीन घरे१५१ चौ.मी. ते २०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भुखंडासाठी ५०० फुटांचे चार घरे२०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाच्या पुढील प्रत्येक ५० चौ.मी. भुखंड क्षेत्रफळासाठी ५०० फुटांचे  एक अतिरिक्त घर ४४ हजार चौ. मीटर क्षेत्र म्हाडाला मिळणारप्रकल्पाच्या आराखड्यासाठी निविदा मागवून मे. माहिमतुरा कन्स्लटंन्ट यांची नियुक्ती केली आहे. या प्रकल्पातून म्हाडास ४४ हजार चौ. मी. क्षेत्र उपलब्ध होणार आहे. तर, बिल्डरला ५,६७,००० चौ. मी. क्षेत्र उपलब्ध होणार असून अंदाजे ४,५०० घरे उपलब्ध होतील.

टॅग्स :मुंबईम्हाडा लॉटरी